सर्वजण तुम‍च्या प्रथम ओळीत असू शकत नाही

Marathi Quotes on Life and People

Marathi Quotes:

जीवन एक रंगमंच आहे म्हणून काळजीपूर्वक आपल्या प्रेक्षकांना आमंत्रित करा.

आपल्या जीवनात सगळेच प्रथम ओळीत असण गरजेच नाही.

आपल्या जीवनात काही लोक आहेत ज्यांना काही अंतरापासून पासून प्रेम करावे लागते .

सर्वजण तुम‌‍‌‌च्या प्रथम ओळीत असू शकत नाही.

तुमच्या आसपास असलेल्या नात्यांवर लक्ष द्या निरीक्षण करा .कोण तुम्हाला खाली नेतो आणि कोण वर. कोण प्रोत्साहित करतो आणि कोण परावृत्त ? कोण उंचावर नेतो आणि कोण उतारावर ? जेव्हा तुम्ही विशिष्ट लोक सोडता तुम्ही अनुभवता चांगले किंवा वाईट ?

जेव्हा तुमच्याजवळ अधिक गुणवत्ता, आदर, वाढ, चांगले मन, प्रेम, सत्य आणि शांती असते तेव्हा कोण  तुमच्या पहिल्या रांगेत असायला हवेत, कोण नको आणि कोण तुमच्या प्रथम ओळीत असावेत याचा निर्णय घेण सोप होत.

जर तुम्ही तुमच्या आसपासचे लोक बदलू शकत नसाल तर कोणते लोक तुमच्या आसपास असावेत हे तुम्ही ठरवू शकतात.

चांगले लोकांचे परिणाम हे चांगले जीवन असल्याचे लक्षात ठेवा आणि म्हणून नेहमी चांगले लोक निवडा जशी आपण चांगली माहिती ठेवतो. नेहमी तुमचे विचार, स्वप्ने नकारात्मक लोकांसमोर मांडू नका.

ते तुमची निवड आणि तुमचे जीवन आहे. हे आपल्यावर अवलंबून आहे.

जीवन एक रंगमंच आहे .

तुमच्या प्रेक्षकांना काळजीपूर्वक आमंत्रित करा.

लेखक : अनोळखी

हृदय आहे म्हणून ते…

Marathi Quotes on Heart

Marathi Quotes:

Marathi Quotes

हृदय आहे म्हणून ते भल्या भल्याना द्यायच नसतं.
पाहताक्षणी देण्यात कधीच शहाणपण नसतं.
अथांग सागर सुंदर आहे म्हणून त्यात पडायच नसतं.
काठाने जाणार्‍या वाटसरुने पाण्यात कधी डोकवायचं नसतं.
एखाद्याच गोड गोड बोलणं मनावर कधी घ्यायचं नसतं.
वाळू सुंदर दिसली म्हणून मासुळीने किनार्‍यावर यायचं नसतं.

त्या सर्व लोकांसाठी ज्यांनी मला…

Marathi Quotes on Smile and People

Marathi Quotes:

Marathi Quotes

त्या सर्व लोकांसाठी ज्यांनी मला स्मित केलं. “धन्यवाद”

For all the people who made me smile. “Thank you”.

प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना…

Marathi Quotes on Love, Friendship and Relationship

Marathi Quotes:

Marathi Quotes

प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.

निराशावादीकडे बघण्याऐवजी आशीर्वाद काय…

Marathi Quotes on Depressing and Blessing

Marathi Quotes:

Marathi Quotes

निराशावादीकडे बघण्याऐवजी आशीर्वाद काय आहे त्याच्याकडे त्याच्याकडे बघा.

Instead of looking at what’s depressing. Look at what’s a blessing. – Kristen Butler

नाती जपली कि सगळ जमतं. हळू हळू…

Marathi Quotes on Relationship and Memories

Marathi Quotes:

Marathi Quotes

नाती जपली कि सगळ जमतं. हळू हळू का होईना कोणी आपलसं बनतं. ओळख नसली तरी साथ देउुन जातं आणि आठवणींच गाठोड आपलसं करुन जातं.

एकटे राहण्याने तुम्ही घाबरु शकता, पण…

Marathi Quotes on Relationship

Marathi Quotes:

Marathi Quotes

एकटे राहण्याने तुम्ही घाबरु शकता, पण वाईट संबंधात राहून तुम्हाला हानी होईल.

Being alone may scare you, but staying in a bad relationship will damage you.

आयुष्यात खूप सारे जण येतात जातात. प्रत्येकालाच…

Marathi Quotes on Life, Remember and Forget

Marathi Quotes:

Marathi Quotes

आयुष्यात खूप सारे जण येतात जातात. प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं. पण जे आपल्या सुख दुखा:त सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं.

अपघात झालेल्या प्रवासी बोटीवरील पती पत्नीची ची गोष्ट

Marathi Stories about Judge

Marathi Stories:

एका प्रवासी बोटीला भर समुद्रात अपघात होतो. त्यावर एक जोडप प्रवास करत असत. ते
दोघेही जीवरक्षक बोटीपाशी येतात. त्यांना दिसत की बोटीत एकच जागा शिल्लक आहे.
पती पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो!
पत्नी बुडत्या बोटी वर थांबते. बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून
जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगते.

शिक्षक गोष्ट सांगायचे थांबून विचारतात, पत्नी पतीला काय म्हणाली असेल?
बहुतेक विद्यार्थी म्हणतात, मला तुम्ही धोका दिलात. मी तुम्हाला ओळखलेच नाही.

एक मुलगा मात्र गप्पच असतो. शिक्षक त्याला विचारतात, “अरे, तुला काय वाटते ते पण सांग!”
तो मुलगा म्हणतो, “गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा!”
शिक्षक चकित होउन विचारतात, “तुला ही गोष्ट माहीत आहे का?”
तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो,”नाही गुरुजी, पण माझी आई वारली

तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!”
तुझे उत्तर बरोबर आहे!” शिक्षक हलकेच म्हणाले.
बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केले.
बऱ्याच वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना,
त्याच्या मुलीला एक डायरी सापडते. त्यातून असे समजते की तीच्या आईला आधीच दुर्धर
आजार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते! त्या मुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो!
त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, “तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती! पण
आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!”

ही गोष्ट आपल्याला सांगते की चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठी, कधी कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्या सहज लक्षात येत नाही! त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेउ नये!

हि गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट च्या माध्यमातून आम्हाला कळवा.

या जगामध्ये काहीही कायमस्वरुपी…

Marathi Quotes on Permanent and Problems

Marathi Quotes:

Marathi Quotes

या जगामध्ये काहीही कायमस्वरुपी नाही, अगदी आपल्या समस्या सुद्धा.

Nothing is permanent in this world, not even our problems.